अयोध्येत भूमिपूजन; देशभर जल्लोष
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीस सुरुवात
प्रभू श्रीरामच्या गजराने आज अयोध्यानगरी दुमदुमली. मंत्रोपच्चाराच्या जयघोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सर्व वातावरण भक्तीमय झाले होते. भूमिपूजनाच्या निमित्ताने देशभरातील राम मंदिरात पूजा आरती करण्यात आली. त्यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
मंदिर भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला कोरोनाचा संसर्गवाढल्याने मर्यादित पाहुण्यांना निमंत्रीत कक्षरण्यात आले होते. आजच्या या कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, साध्वी उमा भारती, रामदेव बाबा, उत्तरप्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडे नऊ वाजता दिल्ली विमानतळाहून लखनऊला विशेष विमानाने आले. तेथून हेलिकॉप्टरने अयोध्येतील साकेत महाविद्यालयाच्या प्रांगणातील हेलिपॅडवर आगमन झाले. तेथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी स्वागत केले. अयोध्येचा रक्षक हनुमान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे हनुमान गढी येथील हनुमान मंदिरात पोहचले. तेथे त्यांनी हनुमानाची पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत फक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने पंतप्रधानांचे स्वागत मुकूट घालून करण्यात आले. हनुमान गढीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या ताफ्यासह राम मंदिराच्या जागेवर पोहचले. त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते पारिजातकाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला देशभरातील प्रमुख योगी, साधू, संतांना निमंत्रीत करण्यात आले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रीतांची सोशल डिस्टन्सिंग पाळत आसन व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोपचाराच्या जय घोषात पूजा करण्यात आली. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी देशभरातील नद्यांमधून जल कलश तसेच विविध स्थळाहून माती आणण्यात आली होती.भूमिपूजनाचा मुहूर्त दुपारी 12.40 चा काढण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराचा प्रमुख गाभारा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी आधारशिला रोवण्यात आली.
अयोध्येत कडेकोट बंदोबस्त
राज मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने अयोध्या शहरात पोलिसांचा व एसपीजीच्या विशेष पथकाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अयोध्येत बाहेर गावाहून येणार्यांची कसून तपासणी करण्यात येत होती. तसेच शहरातील चौका चौकात चोख बंदोबस्त होता. प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यात येत होती. उत्तरप्रपदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ दिवसांपासून कार्यक्रमाच्या नियाीेजनासह बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला होता.